- खंडेराया सांग बोल गोड गोड गं..
नाही कळलं म्हातरर...खंडोबा तो हायना...
त्रिखंडाचा राजा ची करून टाकली दैयना....
राग राग करनं म्हाताऱ्याचा सोड गं...
राग राग करनं म्हाताऱ्याचा सोड गं...
ऐ.. बनू गं.....
खंडेराया सांग बोल गोड गोड गं...
मल्लु देवा संग बोल गोड गोड गं...
बोल गोड गोड बनू बोल गोड गोड गं.. (२)
मल्लु देवाची लीला हि न्यारी...
धनगर बनूनी आला..तुझ्या गं दारी...
राण मळा मधी मेडंर चारी...
भांडार कापळी शिव चमत्कारी...
बनू साठी देव माझा मना मधी झुरतो
जागाचा जेठी तिच्या पुढं पुढं करतो
खंडु बावट्या सांग नातं तुझं जोड गं (२)
ऐ.. बनू गं.....
खंडेराया सांग बोल गोड गोड गं...
मल्लु देवा संग बोल गोड गोड गं...
बोल गोड गोड बनू बोल गोड गोड गं.. (२)
आवडीने खातो बघा भजी भाकरी...
देवादी देव करतो बनू घरी चाकरी...
शेळ्या मेंड्या आणि आवडी कोकरी..
भक्ता साठी देव केलीस नोकरी..
चंदनपुरात होती बनू एक नारी...
धनगर वाड्यात पुजला शिव मल्हारी
तू तर मल्हारीला केला बनू येडं गं..(२)
ऐ.. बनू गं.....
खंडेराया सांग बोल गोड गोड गं...
मल्लु देवा संग बोल गोड गोड गं...
बोल गोड गोड बनू बोल गोड गोड गं.. (२)
गिरना नदी च्या काठी क्षण तो आला...
राजा मल्हारी बनूबाई चा झाला..
सदानंदा चा येळकोट बोला...
मल्हारी चंदनाला प्रसन्न झाला...
पाचंपाऱ्या उचलून घेण्याची रित...
रुनानु बंधनाची वाडलीया प्रीत..
सोनू पाण्यातुन सोडावतोय कोडं गं (२)
ऐ.. बनू गं.....
खंडेराया सांग बोल गोड गोड गं...
मल्लु देवा संग बोल गोड गोड गं...
बोल गोड गोड बनू बोल गोड गोड गं.. (२)
No comments:
Post a Comment