Friday, May 28, 2021

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ /Jagnyache deva song lyrics

 जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ 

दुर्गुणाचा वळ पहावेना

सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ 

मरणाची झळ साहावेना


तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ

उन्मादाचा मळ झाकवेना..

विठ्ठलाची आस वाढावी सरळ

विषाचे करळ टाकावेना..

 जगण्याचे देवा .....


ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान

चरणात ध्यान राहुदेगा..

अमृताची वेल अमृताचा देह

भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..

विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग 

मन झाले दंग माऊलीचे..

घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग

जीवनाचा रंग पाहुदेगा..


विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल


No comments:

Post a Comment