सावळे रुपडे चोरटे चित्ताचे
उभे पंढरीचे.... विटेवरी.....
उभे पंढरीचे विटेवरी.......×२
रामा...
सावळे रुपडे चोरटे चित्ताचे... ×३
उभे पंढरीचे विटेवरी
रामा...
सावळे रुपडे चोरटे चित्ताचे... ×२
डोळियांची धणी पाहता न पुरे... ×२
तयालागी झुरे मन माझे... ×२
सावळे रुपडे....
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडूनी... ×२
आ~~~
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडूनी... ×२
श्रीमुख नयनी न देखता... ×२
रामा... सावळे रुपडे.....
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने... ×२
चित्त मोहियेले....आ~~~
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने...
तुका म्हणे येणे गरुडध्वजे... ×२
रामा...सावळे रुपडे....